पुरंदर रिपोर्टर Live.
मोरगाव, प्रतिनिधी.
मोढवे (ता. बारामती) येथील बेबीताई शंकरराव मोरे (वय ७०) यांचे आज पहाटे एक वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मोढवे गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बारामती दूध संघाचे संचालक व मोढवे गावचे माजी सरपंच वैभव मोरे यांच्या त्या मातोश्री, तसेच मोढवे गावच्या माजी सरपंच शीतल मोरे यांच्या त्या सासूबाई व मुसा काकडे कॉलेज चे कार्यालय अधीक्षक सतीश लकडे यांच्या त्या सासुबाई होत.
त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता मोढवे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

0 Comments